चरित्र
चरित्र
अरुण चिंतामण टिकेकर (१ फेब्रुवारी १९४४ – १९ जानेवारी २०१६) हे मराठी पत्रकार, संपादक आणि लेखक होते. माधव गडकरी यांच्यानंतर ते ११ वर्षे 'लोकसत्ता'चे संपादक होते. त्यापूर्वी ते 'टाइम्स ऑफ इंडिया'च्या १५० वर्षांचा इतिहास लिहिण्याच्या कामावर होते आणि 'महाराष्ट्र टाइम्स'मध्ये उपसंपादक होते. नंतर ते 'लोकमत'मध्ये गेले आणि पुढे सकाळ समूहाचे संपादकीय संचालक झाले. त्यांचे आजोबा रामचंद्र विनायक टिकेकर हे 'केसरी'त 'धनुर्धारी' या टोपणनावाने सदर लिहीत. स्वतः अरुण टिकेकर 'दस्तुरखुद्द', 'टिचकीबहाद्दर' अशा अनेक टोपणनावांनी सदरलेखन करत; त्यांनी अनेक सदरलेखक घडवले. त्यांना अमेरिकेतील महाराष्ट्र फाउंडेशनचा जीवनगौरव पुरस्कार मिळाला. मुंबईच्या एशियाटिक सोसायटीने त्यांच्या नावाने 'डॉ. अरुण टिकेकर प्रगत अभ्यास केंद्र' स्थापन केले आहे.
समुदायाने जोडले
बंद