अरुणा रामचंद्र ढेरे

चरित्र

चरित्र

डॉ. अरुणा ढेरे (जन्म : २ फेब्रुवारी १९५७, पुणे) या मराठी लेखिका आणि कवयित्री आहेत. ज्येष्ठ संशोधक-साहित्यिक डॉ. रा. चिं. ढेरे यांच्या त्या कन्या असून बालपणापासून त्यांना साहित्य आणि समीक्षेची वैचारिक पार्श्वभूमी लाभली. त्यांनी समाजशास्त्र, मानसशास्त्र यांबरोबरच वेद, उपनिषदे, रामायण-महाभारत तसेच विविध धर्मग्रंथ, दंतकथा आणि मिथके यांचा अभ्यास केला. त्यांचे शिक्षण पुण्यातील हुजूरपागा, गरवारे महाविद्यालय आणि स. प. महाविद्यालय येथे झाले. १९७७ मध्ये पुणे विद्यापीठाच्या बी.ए. परीक्षेत त्या सुवर्णपदकासह प्रथम आल्या.

समुदायाने जोडले
बंद