चरित्र
चरित्र
आशा बगे या मराठी कादंबरीकार आणि कथालेखिका आहेत. त्यांचे बालपण नागपूर येथे गेले; त्यांचे वडील वकील होते. मराठी साहित्य आणि संगीत या विषयांत त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतले. नोकरी न करता घरसंसार सांभाळत त्यांनी लेखन केले. त्यांच्या लेखनाची सुरुवात 'सत्यकथा'पासून झाली; 'रुक्मिणी' ही त्यांची गाजलेली कथा १९८० मध्ये प्रसिद्ध झाली. मौजचे श्री. पु. भागवत आणि राम पटवर्धन यांनी त्यांच्या लेखनशैलीला आकार दिला. २०१८ पर्यंत त्यांचे १३ लघुकथासंग्रह, सात कादंबऱ्या आणि ललितलेखांची दोन पुस्तके प्रकाशित झाली होती. 'मारवा' आणि 'दर्पण' हे त्यांचे कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. एका तमिळ मुलीचे भावविश्व रेखाटणाऱ्या 'भूमी' या कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला; 'त्रिदल' या कादंबरीलाही अनेक सन्मान मिळाले.
समुदायाने जोडले
बंद