चरित्र
शैक्षणिक अर्हता
एम.ए. (राज्यशास्त्र)
संस्कृत विशारद
वृत्तपत्रविद्या पदविका
प्रकाशित साहित्य संपदा
कवितासंग्रह: शब्दपल्लवी, स्वसंवेद्य, मनभावन, रक्तचंदन, दिगंतराची धून
कथासंग्रह: हृदयांतरिच्या कथा, मध्यस्थ, कळ्यांचे ऋतू
ललित व वैचारिक लेखन: माझ्या कुत्र्याच्या छत्र्या (विनोदी लेखसंग्रह), मित्रा सांगते आपलीच गोष्ट (स्त्री-पुरुष नात्याविषयी), बोलू आनंदे (उत्तम कसे बोलावे याविषयी)
ललितबंध: एकपानी आरस्पानी (भाग १ व २), रुजवाई
कादंबरी: '१२ जुलै, १९६१' (पानशेत धरणफुटीच्या पार्श्वभूमीवर)
अनुवाद: अतिदूरचे बांधव (इंग्लिश विज्ञान काल्पनिकेचा अनुवाद), डेथ ऑफ ए मॅड मॅथेमॅटिशिअन (आकाशवाणी, पुणेसाठी नाटकाचा अनुवाद) - मूळ लेखन: श्रीनिवास शारंगपाणी
संपादने: अभिवाचन: एककला, ऑल इज वेल (पौगंडावस्थेविषयक अंक), छात्र प्रबोधन मासिक (मानद संपादक), समईच्या शब्दकळ्या (कै. संजीवनी मराठेंची कविता), नृत्यावकाश (नृत्यविषयक दिवाळी अंक)
बाल व कुमार साहित्य
लेख/कथासंग्रह: मधली सुट्टी, एकदम सही, कार्टुन कार्टी, स्वप्नजा स्वप्नाळू, टाईम प्लीज, विंचू चावला हो, मी काय करू?, जादूची कवळी
कवितासंग्रह: परिसरातील गाणी, संस्कार गीते, अंकुरलेले गीत नवे, गाणी बारा महिन्यांची, किड्यांशी मैत्री करू चला, घरचे दारचे सवंगडी, पपेष्टु पपेष्टु गाणे म्हण, स्कूल दुनिया
अनुवाद (प्रथम बुक्स): काका आणि मुन्नी, भुताच्या गोष्टी, आंबा पडला ठप्प, बोमाक्काची बाहुली, इयादचे कबूतर, कर्राकर्रा कर्राकर्रा, मुलगा आणि ढोलके, नंदिनी कुठे गेली, आकाशातील व्हेल इत्यादी.
पुरस्कार व सन्मान
स्वसंवेद्य: तुका म्हणे पुरस्कार
ललित लेखन: लोकमत पुरस्कार (उत्कृष्ट ललित लेखनासाठी)
परिसरातील गाणी: महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे - उत्कृष्ट बालसाहित्य पुरस्कार
पुणे मराठी ग्रंथालयाचा 'कै. न. चिं. केळकर पुरस्कार' व बालकुमार साहित्य संमेलनाचा 'आनंदयात्रा पुरस्कार'
म. सा. प. सोलापूरचा 'कै. रायते गुरूजी बालसाहित्य पुरस्कार'
मित्रा, सांगते आपलीच गोष्ट: पुणे नगर वाचन मंदिरचा 'कै. श्री. ना. बनहट्टी पुरस्कार'
मनभावन: मराठी वाङ्मय परिषद, बडोदे यांचा 'अभिरुची गौरव पुरस्कार'
याज्ञवल्क्य परिवार पुणे यांचा 'कै. शैलजा काळे पुरस्कार'
काव्यलेखन: म.सा.प. पुणेचा 'कै. ना.घ. देशपांडे पुरस्कार' (छंद-वृत्तबद्ध काव्यलेखनासाठी)
अध्यक्षपदे व नेतृत्व
बालकुमार साहित्य संमेलन, रहिमतपूर (२०१८)
१७ वे गोमंतक महिला साहित्य संमेलन (२०१९)
शेकोटी साहित्य कवी-संमेलन, फोंडा-गोवा (२०२५)
विशेष योगदान व प्रसारमाध्यमे
इयत्ता सातवी व दहावीच्या पाठ्यपुस्तकात कवितांचा समावेश.
रविवार लोकमत, लोकसत्ता आणि दिव्य मराठीमध्ये सदरांचे लेखन. दर्जेदार दिवाळी अंक व मासिकांतून सातत्याने लेखन आणि पुस्तक परीक्षणे.
आकाशवाणी, विद्यावाणी, बालचित्रवाणी आणि दूरदर्शनसाठी विविध कार्यक्रमांचे लेखन, सादरीकरण व गीतलेखन.
'अरंगेत्रम' व नृत्याच्या कार्यक्रमांसाठी संगीतिका/संहिता लेखन, आणि विविध स्पर्धांसाठी एकांकिका लेखन.
विविध ऑडिओ कॅसेट्स (मुलाफुलांची गाणी, सांजवेळ इ.) आणि शैक्षणिक सीडीजसाठी गीतलेखन. अनेक गीते युट्युबवर उपलब्ध.
साहित्यिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांत प्रमुख पाहुणी, वक्ता व परीक्षक म्हणून सहभाग.
कार्यक्रमांचे संहितालेखन व निर्मिती
पंचवेध: पंचमहाभूते आणि माणूस यांच्यातील नाते सांगणारा संगीतमय कार्यक्रम.
आज भेटल्या कृष्णसख्या: महाभारतीय स्त्रियांची सद्यकालीन प्रतिबिंबे सादर करणारा कार्यक्रम.
अनवाणी ते कॅटवॉक: स्त्री-जीवनाचा पट मांडणारा अभिवाचन व गायनाचा कार्यक्रम.
कळ्यांचे ऋतू: वयात आलेल्या मुलींच्या कथा व समुपदेशनाचा कार्यक्रम.
साधनाताई आमटेंवर आधारित 'साधना...समिधा', तसेच 'जन्मजाह्नवी', 'नक्षत्रांचे ठसे' इत्यादी कार्यक्रमांचे संहितालेखन. बालकुमार, तरुण व प्रौढांसाठी काव्यवाचन आणि कार्यशाळांचे आयोजन.