अशोक नायगावकर

चरित्र

चरित्र

अशोक नायगावकर (जन्म : २९ डिसेंबर १९४७, वाई) हे मराठी कवी आहेत. बी.कॉम.पर्यंत शिक्षण घेतल्यावर त्यांनी बँक ऑफ बडोदामध्ये ३१ वर्षे नोकरी केली आणि नंतर स्वेच्छानिवृत्ती घेतली. उपरोधाच्या माध्यमातून गंभीर समाजचिंतन करणारे कवी अशी त्यांची ओळख आहे. त्यांच्या कविता 'सत्यकथा'त प्रसिद्ध होत असत आणि 'लोकसत्ता'त त्यांनी गद्यलेखनही केले. इस्रायल, कतार, दुबई, लंडन, शिकागो, सिंगापूर, बँकॉक आदी ठिकाणच्या महाराष्ट्र मंडळांमध्ये त्यांनी कवितेच्या मैफली केल्या आहेत. 'वाटेवरच्या कविता' हा त्यांचा संग्रह आहे. डिसेंबर २०१२ मध्ये दापोली येथे झालेल्या १४व्या कोकण मराठी साहित्य संमेलनाचे आणि मार्च २०२० मध्ये फलटण येथे झालेल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या विभागीय साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. भाई फुटाणे प्रतिष्ठानचा राज्यस्तरीय पुरस्कारही त्यांना मिळाला आहे.

समुदायाने जोडले
बंद