चरित्र
चरित्र
अशोक पुरुषोत्तम शहाणे (जन्म : ७ फेब्रुवारी १९३५) हे मराठी लेखक, भाषातज्ज्ञ, संपादक आणि प्रकाशक आहेत. त्यांचे प्राथमिक-माध्यमिक शिक्षण सातारा येथे झाले आणि पुण्यातील एम.ई.एस. (आताचे गरवारे) कॉलेजमधून ते बी.ए. झाले. महाविद्यालयात असतानाच त्यांनी 'साधना', 'रहस्यरंजन' इत्यादी नियतकालिकांतून लेखन केले आणि पुण्यात बंगाली भाषेचा अभ्यास केला. १९५८–६० च्या सुमारास आकार घेऊ लागलेल्या अनियतकालिकांच्या वाङ्मयीन चळवळीत ते सक्रिय झाले. प्रस्थापित लेखक-प्रकाशकांवर टीका करणारा त्यांचा 'मराठी वाङ्मयावर क्ष-किरण' हा लेख खळबळजनक ठरला आणि ते या चळवळीचे अध्वर्यू मानले जाऊ लागले.
समुदायाने जोडले
बंद