चरित्र
चरित्र
अटलबिहारी वाजपेयी (२५ डिसेंबर १९२४ – १६ ऑगस्ट २०१८) हे भारताचे दहावे पंतप्रधान आणि हिंदी कवी होते. अकराव्या लोकसभेत तेरा दिवसांसाठी आणि त्यानंतर १९ मार्च १९९८ ते १९ मे २००४ या काळात ते पंतप्रधान होते. ते भारतीय जनसंघाचे संस्थापक सदस्य व अध्यक्ष (१९६८–१९७३) आणि भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष (१९८०–१९८६) होते. २४ मार्च १९७७ ते २८ जुलै १९७९ या काळात त्यांनी भारताचे परराष्ट्रमंत्रिपद भूषवले. १९९१ ते २००९ या काळात ते लखनौचे खासदार होते.
समुदायाने जोडले
बंद