चरित्र
चरित्र
बाळ सीताराम मर्ढेकर ऊर्फ बा. सी. मर्ढेकर (१ डिसेंबर १९०९ – २० मार्च १९५६) हे मराठी कवी आणि लेखक होते. त्यांना मराठी नवकाव्याचे प्रवर्तक मानले जाते. परंपरागत उपमा आणि प्रतिमा न वापरता त्यांनी कवितेत नव्या प्रतिमांचा उपयोग केला आणि ते आपल्या अनुभूतींशी प्रामाणिक राहिले. दुसऱ्या महायुद्धानंतरच्या परिस्थितीतील नीरसता, कृत्रिमता आणि मानवसंहार यांमुळे आलेली निराशा आणि वैफल्य त्यांच्या कवितेत उमटते, असे मानले जाते; त्यांचे काव्य 'वेदनेचे काव्य' म्हणून ओळखले जाते. त्यांच्या कवितेत आशय आणि अभिव्यक्ती यांचा सुसंवाद आढळतो. 'सौंदर्य आणि साहित्य' या ग्रंथासाठी त्यांना १९५६ चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. त्यांच्या कवितेवर विजया राजाध्यक्ष, यशवंत मनोहर आदींनी ग्रंथ लिहिले आहेत.
समुदायाने जोडले
बंद