बाबा आमटे

इंग्रजी नाव
Baba Amte

चरित्र

चरित्र

मुरलीधर देवीदास आमटे ऊर्फ बाबा आमटे (२६ डिसेंबर १९१४ – ९ फेब्रुवारी २००८) हे मराठी समाजसेवक होते. त्यांचा जन्म वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे एका जमीनदार कुटुंबात झाला. नागपूर विद्यापीठातून त्यांनी बी.ए. (१९३४) आणि एलएल.बी. (१९३६) केले आणि काही काळ वकिली केली. सेवाग्राम आश्रमात राहत असताना गांधीजींच्या विचारांचा त्यांच्यावर प्रभाव पडला. कुष्ठरोग्यांच्या शुश्रूषेसाठी त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यात 'आनंदवन' हा आश्रम सुरू केला. वन्यजीव संरक्षण आणि नर्मदा बचाओ आंदोलन यांसारख्या चळवळींतही त्यांनी भाग घेतला. सतत कामात असूनही त्यांनी 'ज्वाला आणि फुले' आणि 'उज्ज्वल उद्यासाठी' हे काव्यसंग्रह लिहिले. त्यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार आणि पद्मविभूषण हे सन्मान मिळाले.

समुदायाने जोडले
बंद