बाबासाहेब पुरंदरे

इंग्रजी नाव
Babasaheb Purandare

चरित्र

चरित्र

बळवंत मोरेश्वर पुरंदरे ऊर्फ बाबासाहेब पुरंदरे (२९ जुलै १९२२ – १५ नोव्हेंबर २०२१) हे मराठी साहित्यिक, नाटककार, इतिहासकार आणि वक्ते होते. त्यांचे मूळ गाव पुणे जिल्ह्यातील सासवड. आपल्या ओजस्वी वाणीने त्यांनी शिवचरित्र घराघरांत पोहोचवले. 'राजा शिवछत्रपती' या ग्रंथाचे लेखन आणि 'जाणता राजा' या महानाट्याचे लेखन-दिग्दर्शन त्यांनी केले. महाराष्ट्र सरकारने त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला, तसेच त्यांना पद्मविभूषण सन्मान मिळाला. २९ जुलै २०२१ रोजी त्यांनी वयाची शंभरी पूर्ण केली. १५ नोव्हेंबर २०२१ रोजी पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू असताना वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले.

समुदायाने जोडले
बंद