चरित्र
चरित्र
बाबुराव अर्नाळकर हे चंद्रकांत सखाराम चव्हाण (९ जून १९०६ – ५ जुलै १९९६) यांचे टोपणनाव. ते मराठीतील आघाडीचे आणि अतिशय लोकप्रिय रहस्यकथा लेखक होते. (त्यांच्या जन्मवर्षाबद्दल १९०६, १९०७ व १९०९ असे वेगवेगळे उल्लेख आढळतात.) वसई तालुक्यातील अर्नाळा हे त्यांचे मूळ गाव. त्यांनी स्वातंत्र्यचळवळीत भाग घेऊन कारावास भोगला होता. 'चौकटची राणी' ही त्यांची पहिली गुप्तहेरकथा होती. त्यानंतर त्यांनी एक हजाराहून अधिक रहस्यकथा लिहिल्या. झुंजार, काळा पहाड, धनंजय-छोटू, दर्यासारंग ही त्यांनी निर्माण केलेली पात्रे मराठी वाचकांच्या घराघरांत पोहोचली. सर्वसामान्य वाचकांना मराठी वाचनाची गोडी लावण्याचे मोठे श्रेय त्यांना दिले जाते.
समुदायाने जोडले
बंद