चरित्र
चरित्र
बाबुराव बागुल (१७ जुलै १९३० – २६ मार्च २००८) हे आंबेडकरवादी साहित्यासाठी ओळखले जाणारे मराठी लेखक आणि कवी होते. त्यांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील विहितगाव येथे झाला आणि लहानपणापासूनच त्यांनी जातीय विषमतेचे अनुभव घेतले. विद्रोही आंबेडकरवादी कथांचे प्रमुख उद्गाते आणि प्रखर वास्तववादी कादंबरीकार म्हणून त्यांची ओळख होती. शोषित, उपेक्षित, झोपडपट्टीतील आणि फुटपाथवरील जनजीवनाचे भेदक चित्रण त्यांनी केले. प्रभावी विद्रोही भाषाशैली आणि जिवंत प्रसंगचित्रण ही त्यांच्या लेखनाची वैशिष्ट्ये होती. १९६९ मध्ये 'मरण स्वस्त होत आहे' हा त्यांचा कथासंग्रह प्रकाशित झाला. 'जेव्हा मी जात चोरली होती' आणि 'सूड' या त्यांच्या कथा प्रसिद्ध आहेत; स्त्रीप्रधान कथालेखन हाही त्यांच्या लेखनाचा महत्त्वाचा भाग होता.
समुदायाने जोडले
बंद