बाळ फोंडके

चरित्र

चरित्र

डॉ. गजानन पुरुषोत्तम ऊर्फ बाळ फोंडके (जन्म : २२ एप्रिल १९३९) हे विज्ञानकथा लेखक आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स कम्युनिकेशनचे माजी संचालक आहेत. अणुभौतिकीत एम.एस्सी. केल्यानंतर त्यांनी काही काळ मुंबईच्या विल्सन महाविद्यालयात अध्यापन केले. नंतर भाभा अणुसंशोधन केंद्रात (बीएआरसी) ते जीववैद्यक विभागात रुजू झाले आणि रोगप्रतिबंधकशास्त्र, जीवभौतिकी आणि कर्करोगासंबंधी संशोधन केले. १९६७ मध्ये लंडन विद्यापीठातून त्यांनी जीवभौतिकीत पीएच.डी. मिळवली. बीएआरसीत २३ वर्षे काम करून ते निवृत्त झाले. अनेक वर्तमानपत्रांतून ते विज्ञानविषयक लेखन करतात. 'अंतराळ', 'आपले पूर्वज', 'खगोल', 'पशू-पक्षी', 'प्राणिजगत' आणि 'भूगोल' ही सहा पुस्तके त्यांच्या 'विज्ञान नवलाई' या पुस्तकमालिकेचा भाग आहेत.

समुदायाने जोडले
बंद