बालकवी

चरित्र

चरित्र

बालकवी हे त्र्यंबक बापूजी ठोंबरे (१३ ऑगस्ट १८९० – ५ मे १९१८) यांचे टोपणनाव. ते मराठीतील श्रेष्ठ निसर्गकवी होते. त्यांचा जन्म खानदेशात धरणगावजवळ झाला. १९०७ मध्ये जळगाव येथे झालेल्या पहिल्या महाराष्ट्र कविसंमेलनात अध्यक्ष कान्होबा रणछोडदास कीर्तिकर यांनी त्यांना 'बालकवी' ही उपाधी दिली. त्यांची काव्यकारकीर्द सुमारे दहा वर्षांची होती. बालपणातील काही काळ ते कवी रेव्हरंड नारायण वामन टिळक यांच्या घरी राहिले. 'आनंदी आनंद गडे', 'औदुंबर', 'फुलराणी', 'श्रावणमास' या त्यांच्या कविता प्रसिद्ध आहेत. त्यांच्या कवितेत निसर्ग मध्यवर्ती असून काही कवितांत उदासीनताही व्यक्त होते. त्यांच्या कविता बालभारतीच्या पाठ्यपुस्तकांत समाविष्ट झाल्या.

समुदायाने जोडले
बंद