चरित्र
चरित्र
बहिणाबाई नथुजी चौधरी (२४ ऑगस्ट १८८० – ३ डिसेंबर १९५१) या मराठी कवयित्री होत्या. त्यांचा जन्म जळगाव जिल्ह्यातील असोदे या गावी झाला. वयाच्या तेराव्या वर्षी नथुजी चौधरी यांच्याशी त्यांचा विवाह झाला आणि वयाच्या तिसाव्या वर्षी त्यांना वैधव्य आले. त्या निरक्षर होत्या; शेतकाम आणि घरकाम करताना त्या लेवा गणबोलीत उत्स्फूर्तपणे ओव्या आणि कविता रचून गात. त्यांचे पुत्र सोपानदेव चौधरी आणि इतर आप्तांनी त्या कविता लिहून जपल्या; अनेक रचना लिहून न ठेवल्यामुळे नष्ट झाल्या. आचार्य प्र. के. अत्रे यांच्यामुळे त्यांच्या कविता लोकांसमोर आल्या. 'अरे संसार संसार' ही त्यांची रचना प्रसिद्ध आहे. जळगावातील त्यांच्या घराचे 'बहिणाई स्मृती' संग्रहालयात रूपांतर झाले आहे.
समुदायाने जोडले
बंद