भालबा केळकर

चरित्र

चरित्र

प्रा. भालचंद्र वामन केळकर ऊर्फ भालबा केळकर (२३ सप्टेंबर १९२० – ६ नोव्हेंबर १९८७) हे मराठी लेखक, नाट्यअभिनेते आणि रसायनशास्त्राचे प्राध्यापक होते. पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात त्यांनी रसायनशास्त्र शिकवले. पुण्यातील 'प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशन' (पीडीए) या नाट्यसंस्थेचे ते संस्थापक होते. १९६१ मध्ये पीडीएने सादर केलेल्या 'प्रेमा तुझा रंग कसा' या नाटकाचे दिग्दर्शन त्यांनी केले आणि त्यातील प्रोफेसर बल्लाळ ही भूमिकाही साकारली. 'वेड्याचे घर उन्हात' आणि 'तू वेडा कुंभार' या नाटकांचे दिग्दर्शनही त्यांनी केले. त्यांनी बालनाट्ये आणि नभोनाट्ये लिहिली; त्यांच्या बालनाट्यांत वैज्ञानिक विषय रंजकपणे मांडलेले असत. 'तो तो नव्हताच', 'असा देव असे भक्त' ही पुस्तके तसेच किशोरांसाठी विज्ञानकथा आणि कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या.

समुदायाने जोडले
बंद