भालचंद्र नेमाडे

इंग्रजी नाव
Bhalchandra Nemade

चरित्र

चरित्र

भालचंद्र वनाजी नेमाडे (जन्म : २७ मे १९३८, सांगवी, खानदेश) हे प्रसिद्ध मराठी कादंबरीकार, कवी आणि टीकाकार आहेत. त्यांनी पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयातून बी.ए., डेक्कन कॉलेजातून भाषाशास्त्रात एम.ए. आणि मुंबई विद्यापीठातून इंग्रजी साहित्यात एम.ए. केले. त्यांनी अनेक ठिकाणी इंग्रजीचे अध्यापन केले आणि मुंबई विद्यापीठातील गुरुदेव टागोर अध्यासनावरून ते निवृत्त झाले. वयाच्या पंचविसाव्या वर्षी प्रकाशित झालेली 'कोसला' (१९६३) ही पांडुरंग सांगवीकर या तरुणाची आत्मकथा असलेली कादंबरी मराठीत वेगळी कलाकृती मानली जाते. 'बिढार', 'जरीला', 'झूल' या चांगदेव पाटील या नायकावरील कादंबऱ्या आणि 'हिंदू : जगण्याची समृद्ध अडगळ' ही त्यांची महत्त्वाची पुस्तके आहेत. 'देखणी' हा त्यांचा कवितासंग्रह आणि 'टीकास्वयंवर' हा समीक्षाग्रंथही प्रसिद्ध आहे.

समुदायाने जोडले
बंद