चरित्र
चरित्र
भारत जगन्नाथ सासणे (जन्म : २७ मार्च १९५१, जालना) हे मराठी कथाकार आहेत. त्यांनी अहमदनगर महाविद्यालयातून बी.एस्सी. पदवी घेतली आणि विविध शासकीय अधिकारीपदांवर नोकरी केली. १९८० नंतरच्या आधुनिक मराठी कथाकारांमध्ये ते अग्रगण्य मानले जातात. पारंपरिकता आणि प्रयोगशीलता यांचे मिश्रण असलेल्या त्यांच्या कथांमधून ग्रामीण, आदिवासी आणि नागर असे समाजजीवनाचे विविध स्तर प्रकट होतात. २०२२ मध्ये उदगीर येथे झालेल्या ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली.
समुदायाने जोडले
बंद