भाऊराव पाटील

चरित्र

चरित्र

कर्मवीर भाऊराव पाटील (२२ सप्टेंबर १८८७ – ९ मे १९५९) हे महाराष्ट्रातील सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षणतज्ज्ञ होते. बहुजन समाजात शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी त्यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली आणि 'कमवा आणि शिका' हे तत्त्व रुजवले. महात्मा फुले यांच्या सत्यशोधक विचारांचा त्यांच्यावर प्रभाव होता आणि ते सत्यशोधक समाजाचे सदस्य होते. त्यांच्या वसतिगृहांत विविध जाती-धर्मांचे विद्यार्थी एकत्र राहत, स्वयंपाक करत आणि जेवत; त्यातून त्यांनी समता आणि बंधुतेचे संस्कार दिले. भारत सरकारने १९५९ मध्ये त्यांना पद्मभूषण देऊन गौरवले आणि १९८८ मध्ये त्यांच्या सन्मानार्थ टपाल तिकीट काढले.

समुदायाने जोडले
बंद