छायाचित्र
भोसले शिवाजीराव अनंतराव, प्राचार्य

भोसले शिवाजीराव अनंतराव, प्राचार्य

चरित्र

चरित्र

आपल्या ओघवत्...या, रसाळ वक्तृत्वशैलीने मराठी माणसांची मने केवळ रिझविणारेच नव्हे तर त्यांच्यावर मूल्यसंस्कार घडविणारे, शब्दांच्या लयदार, आशयघन फेकीने हजारोंना खिळवून ठेवत अक्षरश: मंत्रशक्तीचाच प्रत्यय आणून देणारे प्राचार्य शिवाजीराव भोसले.

आचार्य अत्रे यांच्याखेरीज साठोत्तरीच्या दशकांमध्ये मोठी गर्दी खेचणारा एकमेव वक्ता म्हणून प्रा. भोसले यांचे नाव घ्यावे लागेल. ज्यांचे एक व्याख्यान नव्हे तर सलग अनेक दिवसांची व्याख्यानमाला आयोजित केली जात असे, असे वक्ते महाराष्ट्रात फारच कमी होते, त्यात भोसले यांचा समावेश होता. त्यांच्या व्याख्यानाचे दिनांक किमान एक वर्ष आधी निश्चित होत असत.

व्यासंगी तत्त्वचिंतक... वक्ता दशसहस्रेशु!
पांढरा शर्ट आणि काळा कोट परिधान करणाऱ्या आणि प्रसन्नवदनाने व्याख्यान देणाऱ्या प्राचार्यांच्या व्यक्तिमत्त्वाकडे श्रोते एकाग्रतेने पाहत त्यांचे शब्द कानात साठवतात आणि घनगंभीर आवाजातून उमटणारे "बंधू-भगिनींनो' हे परिचित शब्द कानावर पडताच रसाळ वाणीची सर्वांगसुंदर मैफल अनुभवण् याची उत्कटता, हा चार दशकांहून अधिक काळाचा परिपाठ असलेले व्यासंगी तत्त्वचिंतक आणि "वक्ता दशसहस्रेशु' हे बिरूद ज्यांना खऱ्या अर्थाने लागू होते, ते म्हणजे प्राचार्य शिवाजीराव भोसले. अखंड वाचन, चिंतन, मनन, अध्ययन, योगासन आणि प्राणायाम प्रक्रियांमध्ये स्वतःला बांधून घेणारे प्राचार्य हे साधक होते. सद्विचारांचा "जागर' करीत मानवतेचे "दीपस्तंभ' असलेली व्यक्तिमत्त्वे समाजाला आपल्या वाणी आणि लेखणीतून परिचित करणाऱ्या लोकशिक्षकाच्या निधनाने ओघवत्या वक्तृत्वाचा झरा आटला आहे.