चाणक्य

चरित्र

चरित्र

चाणक्य (इतर नावे : विष्णुगुप्त, कौटिल्य; काळ : अंदाजे इ.स.पू. ३५० च्या सुमारास) हे सम्राट चंद्रगुप्त मौर्याच्या राजसभेतील महामंत्री होते. नंद राजवट संपवून चंद्रगुप्ताला सिंहासनावर बसवण्यात त्यांचा मुख्य सहभाग होता, असे मानले जाते. त्यांनी रचलेला 'कौटिलीय अर्थशास्त्र' हा २५ प्रकरणे आणि सुमारे सहा हजार श्लोक असलेला ग्रंथ अर्थशास्त्र आणि राजनीतीवरील मानवी इतिहासातील पहिला ग्रंथ मानला जातो. या ग्रंथात मांडलेले धोरण 'चाणक्यनीती' किंवा 'दंडनीती' म्हणून ओळखले जाते. संस्कृतमधील मोजक्या गद्य ग्रंथांपैकी तो एक असून त्याचा प्रभाव याज्ञवल्क्य स्मृतीसारख्या नंतरच्या ग्रंथांवर दिसतो.

समुदायाने जोडले
बंद