चिं. वि. जोशी

चरित्र

चरित्र

चिंतामण विनायक जोशी (१९ जानेवारी १८९२ – २१ नोव्हेंबर १९६३) हे विनोदी साहित्यासाठी प्रसिद्ध असलेले मराठी लेखक होते. त्यांचा जन्म आणि मृत्यू पुणे येथे झाला. पाली भाषेचा त्यांचा विशेष अभ्यास होता आणि बडोदे महाविद्यालयात ते पालीचे प्राध्यापक होते. त्यांचे बहुतेक लेखन विनोदी असले तरी व्यक्तिगत जीवनात ते धीरगंभीर प्रवृत्तीचे होते. त्यांच्या 'चिमणराव' आणि 'गुंड्याभाऊ' या पात्रांवर आधारित 'चिमणराव-गुंड्याभाऊ' ही दूरचित्रवाणी मालिका खूप गाजली; त्यात दिलीप प्रभावळकरांनी चिमणरावांची भूमिका केली. त्यांच्या कथेवर १९४२ मध्ये मास्टर विनायक दिग्दर्शित 'सरकारी पाहुणे' हा चित्रपट निघाला.

समुदायाने जोडले
बंद