चंद्रकांत काकोडकर

चरित्र

चरित्र

चंद्रकांत कल्याणदास काकोडकर (२१ मार्च १९२१, काकोडा, गोवा – २३ नोव्हेंबर १९८८) हे लोकप्रिय मराठी कादंबरीकार होते. शरदचंद्र चटर्जींच्या साहित्याचा प्रभाव असल्याने त्यांच्या कादंबऱ्यांवर बंगाली जीवनाचा ठसा दिसतो; त्यांनी अनेक इंग्रजी रहस्यकथांची मराठी रूपांतरेही केली. 'श्यामा' या कादंबरीवर अश्लीलतेचा खटला भरला गेला; १९६९ मध्ये सर्वोच्च न्यायालयात निकाल त्यांच्या बाजूने लागला. 'दर्यावर्दी सिंदबादच्या सात सफरी' (१९६५) हे त्यांनी बाल-कुमारांसाठी आणले. त्यांच्या 'नीलांबरी' कादंबरीवरून 'दो रास्ते' हा हिंदी चित्रपट तयार झाला आणि त्यासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट कथेचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.

समुदायाने जोडले
बंद