द. मा. मिरासदार

इंग्रजी नाव
D. M. Mirasdar

चरित्र

चरित्र

दत्ताराम मारुती मिरासदार ऊर्फ द. मा. मिरासदार (१४ एप्रिल १९२७ – २ ऑक्टोबर २०२१) हे मराठी विनोदी लेखक, कथाकथनकार आणि पटकथाकार होते. त्यांचे शिक्षण अकलूज आणि पंढरपूर येथे झाले; पुण्यात त्यांनी एम.ए. केले. काही वर्षे पत्रकारिता केल्यानंतर ते शिक्षक आणि १९६१ पासून मराठीचे प्राध्यापक झाले. व्यंकटेश माडगूळकर आणि शंकर पाटील यांच्यासह त्यांनी १९६२ पासून महाराष्ट्रभर कथाकथनाचे तीन हजारांहून अधिक कार्यक्रम केले; कॅनडा-अमेरिकेतही त्यांचे कार्यक्रम झाले. श्री. कृ. कोल्हटकर, गडकरी, चिं. वि. जोशी, अत्रे, पु. ल. देशपांडे यांची विनोदी लेखनाची परंपरा त्यांनी पुढे चालवली. 'व्यंकूची शिकवणी', 'माझ्या बापाची पेंड' या त्यांच्या कथा प्रसिद्ध आहेत. ते अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष होते.

समुदायाने जोडले
बंद