चरित्र
चरित्र
डॉ. दत्तात्रेय भिकाजी कुलकर्णी (२५ जुलै १९३४ – २७ जानेवारी २०१६) हे आधुनिक मराठी साहित्यातील विख्यात समीक्षक आणि ललितनिबंधकार होते. १९६८ मध्ये त्यांनी नागपूर विद्यापीठाची पीएच.डी. मिळवली; विदर्भ साहित्य संघाने त्यांना 'साहित्य वाचस्पती' ही पदवी दिली. नागपूर, पुणे आणि उस्मानिया विद्यापीठांच्या अभ्यासक्रमांत त्यांच्या अनेक ग्रंथांचा संदर्भग्रंथ म्हणून समावेश आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या चर्चासत्रांत आणि परिसंवादांत त्यांनी सहभाग घेतला. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत मराठी साहित्य विषयाचे तज्ज्ञ म्हणूनही त्यांनी काम केले.
समुदायाने जोडले
बंद