चरित्र
चरित्र
दिलीप प्रभावळकर हे मराठी आणि हिंदी चित्रपट, नाटक आणि दूरचित्रवाणीवरील अभिनेते तसेच लेखक आहेत. मुंबई दूरदर्शनवरील 'चिमणराव' मालिकेपासून त्यांच्या कारकिर्दीचा प्रवास सुरू झाला. 'झपाटलेला'तील 'तात्या विंचू', 'चौकट राजा' आणि 'एक डाव भुताचा' मधील भूमिका, तसेच 'आबा गंगाधर टिपरे' ही दूरचित्रवाणीवरील व्यक्तिरेखा विशेष गाजली. 'हसवा फसवी' आणि 'वासूची सासू' या नाटकांतील त्यांच्या भूमिका लोकप्रिय झाल्या. २००६ च्या 'लगे रहो मुन्ना भाई' चित्रपटातील महात्मा गांधींच्या भूमिकेसाठी त्यांना पुरस्कार मिळाला. 'दशावतार' (२०२५) चित्रपटात त्यांनी 'बाबूली मेस्त्री' ही प्रमुख भूमिका केली. त्यांनी नाटके आणि लहान मुलांसाठी पुस्तके लिहिली असून 'बोक्या सातबंडे' या पुस्तकमालिकेसाठी त्यांना साहित्य अकादमीचा बालसाहित्य पुरस्कार मिळाला.
समुदायाने जोडले
बंद