दिवाकर

चरित्र

चरित्र

दिवाकर (मूळ नाव शंकर काशिनाथ गर्गे; १८ जानेवारी १८८९ – १ ऑक्टोबर १९३१) हे मराठी लेखक होते. मराठीत 'नाट्यछटा' हा लेखनप्रकार रुजवण्याचे श्रेय त्यांना दिले जाते. त्यांनी एकूण ५१ नाट्यछटा लिहिल्या; 'महासर्प' ही त्यांची पहिली नाट्यछटा होय. 'मग तो दिवा कोणता', 'पंत मेले राव चढले', 'वर्डस्वर्थचे फुलपाखरूं', 'शिवी कोणा देऊं नये' आणि 'फाटलेला पतंग' या त्यांच्या नाट्यछटा विशेष गाजल्या. 'पंत मेले राव चढले' या नाट्यछटेच्या नावावरून मराठीत वाक्प्रचारही रूढ झाला.

समुदायाने जोडले
बंद