डॉ. एस. एल. भैरप्पा

इंग्रजी नाव
Dr. S. L. Bhyrappa

चरित्र

चरित्र

एस. एल. भैरप्पा (२० जुलै १९३४ – २४ सप्टेंबर २०२५) हे लोकप्रिय कन्नड कादंबरीकार होते. त्यांच्या कादंबऱ्या मराठीसह अनेक भारतीय भाषांत अनुवादित झाल्या; 'वंशवृक्ष', 'पर्व', 'जा ओलांडुनी', 'धर्मश्री', 'तंडा', 'काठ' आणि 'सार्थ' या कादंबऱ्यांनी मराठी वाचकांना आकर्षित केले. वयाच्या तेराव्या वर्षी त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला. शिक्षण अर्धवट सोडून त्यांनी देशभर भ्रमंती केली आणि मुंबईत काही काळ रेल्वे हमाल म्हणून काम केले. नंतर म्हैसूरला परत येऊन शिक्षण पूर्ण केले आणि बडोद्याच्या सयाजीराव विद्यापीठातून तत्त्वज्ञानात डॉक्टरेट मिळवली. 'दाटु' या कादंबरीसाठी त्यांना १९७५ चा साहित्य अकादमी पुरस्कार आणि 'मंद्र'साठी २०११ चा सरस्वती सन्मान मिळाला. २०१६ मध्ये त्यांना पद्मश्री मिळाली; पद्मविभूषणनेही त्यांचा गौरव झाला.

समुदायाने जोडले
बंद