चरित्र
चरित्र
दुर्गाबाई देशमुख (१५ जुलै १९०९ – ९ मे १९८१) या भारतीय स्वातंत्र्यसेनानी आणि सामाजिक कार्यकर्त्या होत्या. त्यांचा जन्म आंध्र प्रदेशातील काकीनाडा येथे झाला; त्यांचे वडील समाजसेवक होते. त्या भारतीय संविधान सभेच्या तसेच नियोजन आयोगाच्या सदस्या होत्या. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर आणि स्वतंत्र भारताचे अर्थमंत्री चिंतामणराव देशमुख यांच्याशी त्यांचा १९५३ मध्ये विवाह झाला. देशभक्ती आणि समाजसेवा या मूल्यांचा संस्कार त्यांच्यावर लहानपणापासून झाला होता.
समुदायाने जोडले
बंद