दया पवार

इंग्रजी नाव
Daya Pawar

चरित्र

चरित्र

दया पवार (१५ सप्टेंबर १९३५ – २० सप्टेंबर १९९६) हे मराठी दलित साहित्यातील अग्रणी साहित्यिक होते. त्यांचे खरे नाव दगडू मारुती पवार; 'जागल्या' या टोपणनावानेही त्यांनी लेखन केले. त्यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील धामणगाव येथे झाला आणि संगमनेरच्या बोर्डिंगमध्ये राहून त्यांनी शिक्षण घेतले. 'बलुतं' हे त्यांचे आत्मकथन दलित लेखकाचे मराठीतील पहिले प्रसिद्ध पुस्तक मानले जाते; त्याने मराठीत दलित साहित्याची पाऊलवाट निर्माण केली. या पुस्तकाचे अनेक भारतीय भाषांत तसेच इंग्रजी, फ्रेंच आणि जर्मन भाषांत अनुवाद झाले. 'कोंडवाडा' हा कवितासंग्रह आणि 'चावडी', 'पासंग' हे कथासंग्रहही त्यांनी लिहिले. त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला.

समुदायाने जोडले
बंद