छायाचित्र
ए.पी.जे. अब्दुल कलाम

ए.पी.जे. अब्दुल कलाम

चरित्र

चरित्र

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम (अवुल पाकीर जैनुलाब्दीन अब्दुल कलाम; जन्म : १५ ऑक्टोबर १९३१, रामेश्वरम; मृत्यू : २७ जुलै २०१५, शिलाँग) हे भारतीय एरोस्पेस शास्त्रज्ञ, लेखक आणि २००२ ते २००७ या काळातील भारताचे ११वे राष्ट्रपती होते. सेंट जोसेफ कॉलेज, तिरुचिरापल्ली येथून भौतिकशास्त्रात पदवी घेतल्यानंतर त्यांनी मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये एरोस्पेस अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आणि पुढे डीआरडीओ व इस्रो येथे काम केले. भारताच्या पहिल्या उपग्रह प्रक्षेपण वाहनाचे (SLV-III) ते प्रकल्प संचालक होते आणि अग्नी, पृथ्वी या क्षेपणास्त्रांच्या विकासातील कामामुळे ते 'मिसाइल मॅन' म्हणून ओळखले जातात. 'विंग्ज ऑफ फायर' (मराठी अनुवाद : 'अग्निपंख'), 'इग्नायटेड माइंड्स' ('प्रज्वलित मने'), 'इंडिया २०२०', 'टर्निंग पॉइंट्स' ही त्यांची पुस्तके मराठीतही अनुवादित झाली आहेत. पद्मभूषण (१९८१), पद्मविभूषण (१९९०) आणि भारतरत्न या सन्मानांनी त्यांना गौरवण्यात आले; जनतेचे राष्ट्रपती म्हणून ते लोकप्रिय होते.

समुदायाने जोडले
बंद