गौरी देशपांडे

इंग्रजी नाव
Gauri Deshpande

चरित्र

चरित्र

गौरी देशपांडे (११ फेब्रुवारी १९४२ – १ मार्च २००३) या मराठी लेखिका होत्या. कथा, कादंबरी, ललित लेख, भाषांतर, कविता, संशोधन असे बहुतेक साहित्यप्रकार त्यांनी हाताळले; मराठीबरोबरच त्यांचे इंग्रजी लेखन आणि अनुवादही प्रकाशित झाले. लेखिका आणि संशोधक इरावती कर्वे या त्यांच्या आई, तर दि. धों. कर्वे हे वडील होते; महर्षी धोंडो केशव कर्वे हे त्यांचे आजोबा. १९६८ मध्ये प्रकाशित झालेला 'Between Births' हा इंग्रजी काव्यसंग्रह हे त्यांचे पहिले पुस्तक. 'एकेक पान गळावया' (१९८०), 'तेरुओ आणि काही दूरपर्यंत', 'दुस्तर हा घाट' आणि 'थांग' (१९८९) ही त्यांची पुस्तके आहेत. स्त्रीदेहाभोवती बांधलेल्या नैतिकतेच्या निकषांना त्यांच्या लेखनाने आव्हान दिले.

समुदायाने जोडले
बंद