गिरीजा कीर

इंग्रजी नाव
Girija Keer

चरित्र

चरित्र

गिरिजा कीर (५ फेब्रुवारी १९३३, धारवाड – ३१ ऑक्टोबर २०१९, मुंबई) या मराठी लेखिका आणि कथाकथनकार होत्या. माहेरचे त्यांचे नाव रमा नारायणराव मुदवेडकर होते; मुंबई विद्यापीठाची बी.ए. पदवी मिळवल्यानंतर त्यांच्या लेखनाला सुरुवात झाली. कथा, कादंबरी, मुलाखती, प्रवासवर्णने, बालसाहित्य अशा विविध प्रकारांत त्यांची एकूण ८५ पुस्तके प्रकाशित झाली. १९६८ ते १९७८ या काळात त्या 'अनुराधा' मासिकाच्या साहाय्यक संपादिका होत्या. कामगार वस्ती, कुष्ठरोग्यांच्या वसाहती आणि आदिवासी भागांतील जीवनाचा जवळून अभ्यास करून त्यांनी बरेचसे लेखन केले.

समुदायाने जोडले
बंद