चरित्र
चरित्र
गजानन माधव मुक्तिबोध (१३ नोव्हेंबर १९१७ – ११ सप्टेंबर १९६४) हे आधुनिक भारतातील प्रख्यात हिंदी कवी, समीक्षक, कथाकार, निबंधकार आणि विचारवंत होते. त्यांचा जन्म तत्कालीन ग्वाल्हेर संस्थानातील मुरेना जिल्ह्यातील शिवपूर येथे झाला; माधवराव आणि पार्वतीबाई हे त्यांचे आईवडील होते. त्यांचे पणजोबा वासुदेव हे मूळचे जळगावचे होते आणि त्यांचे मूळ आडनाव कुलकर्णी होते. मराठीतील प्रसिद्ध साहित्यिक शरच्चंद्र माधव मुक्तिबोध हे त्यांचे धाकटे बंधू होत.
समुदायाने जोडले
बंद