गंगाधर पानतावणे

चरित्र

चरित्र

डॉ. गंगाधर विठोबाजी पानतावणे (२८ जून १९३७ – २७ मार्च २०१८) हे मराठी लेखक, संशोधक, समीक्षक आणि आंबेडकरवादी विचारवंत होते. 'अस्मितादर्श' चळवळीचे जनक म्हणून ते ओळखले जातात. ते पहिल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. अनेक कवी-लेखकांच्या पुस्तकांना त्यांनी विवेचक प्रस्तावना लिहिल्या. २०१८ मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर केला.

समुदायाने जोडले
बंद