गोविंद पानसरे

इंग्रजी नाव
Govind Pansare

चरित्र

चरित्र

गोविंद पानसरे (२४ नोव्हेंबर १९३३, कोल्हार, ता. राहता, जि. अहमदनगर – २० फेब्रुवारी २०१५, मुंबई) हे महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळीचे विचारवंत आणि कम्युनिस्ट कामगार नेते होते. १९५२ पासून ते कम्युनिस्ट पक्षाचे सदस्य होते आणि अनेक सामाजिक चळवळींत सक्रिय होते. कामगारांसाठी तसेच घरकामगार महिलांसाठी त्यांनी अनेक लढे उभारले. कोल्हापुरातील टोलविरोधी आंदोलनातही ते अग्रभागी होते. १६ फेब्रुवारी २०१५ रोजी कोल्हापुरात दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर गोळीबार केला आणि उपचारादरम्यान २० फेब्रुवारी रोजी मुंबईत त्यांचे निधन झाले.

समुदायाने जोडले
बंद