गोविंद तळवलकर

चरित्र

चरित्र

गोविंद श्रीपाद तळवलकर (२२ जुलै १९२५ – २१ मार्च २०१७) हे मराठी आणि इंग्रजीतील पत्रकार आणि लेखक होते. त्यांचा जन्म डोंबिवली येथे झाला. वृत्तपत्रीय अग्रलेखांसाठी आणि सामाजिक, राजकीय, आंतरराष्ट्रीय घडामोडींवरील भाष्यासाठी ते विशेष ओळखले जात. १९४७ मध्ये बी.ए. झाल्यावर त्यांनी शंकरराव देव यांच्या 'नवभारत'मध्ये काम सुरू केले. १९५० ते १९६२ या काळात ते 'लोकसत्ता'त उपसंपादक होते. १९६८ ते १९९६ अशी सुमारे अठ्ठावीस वर्षे ते 'महाराष्ट्र टाइम्स'चे संपादक होते. निवृत्तीनंतर ते अमेरिकेतील ह्युस्टन येथे मुलीकडे राहिले. 'सोव्हिएत साम्राज्याचा उदय आणि अस्त' या पुस्तकासाठी त्यांना न. चिं. केळकर पुरस्कार मिळाला. दुर्गा रतन आणि रामनाथ गोयंका पत्रकारिता पुरस्कार, महाराष्ट्र सरकारचा लोकमान्य टिळक पुरस्कार आणि २००७ चा जीवनगौरव पुरस्कार हे सन्मानही त्यांना मिळाले.

समुदायाने जोडले
बंद