ग्रेस

चरित्र

चरित्र

माणिक सीताराम गोडघाटे ऊर्फ कवी ग्रेस (१० मे १९३७ – २६ मार्च २०१२) हे मराठी कवी होते. मर्ढेकरोत्तर नवकवींच्या दुसऱ्या पिढीतील प्रमुख कवींमध्ये त्यांची गणना होते. त्यांचा जन्म नागपूर येथे झाला. आईच्या अकाली मृत्यूनंतर त्यांचे प्रारंभीचे जीवन कष्टमय होते. १९६६ मध्ये ना. के. बेहरे सुवर्णपदक मिळवून ते नागपूर विद्यापीठातून मराठीत एम.ए. झाले. त्यांनी धनवटे नॅशनल कॉलेज आणि नंतर वसंतराव नाईक समाजविज्ञान संस्थेत (मॉरिस कॉलेज) मराठीचे अध्यापन केले आणि १९९७ मध्ये निवृत्त झाले. त्यांचे पाच काव्यसंग्रह आणि सात ललित लेखसंग्रह प्रकाशित झाले. 'वाऱ्याने हलते रान' या ललित लेखसंग्रहासाठी त्यांना २०१२ चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला.

समुदायाने जोडले
बंद