चरित्र
चरित्र
गजानन त्र्यंबक माडखोलकर (२८ डिसेंबर १८९९, मुंबई – २७ नोव्हेंबर १९७६, नागपूर) हे मराठी लेखक, कवी, पत्रकार आणि समीक्षक होते. कारकिर्दीच्या आरंभी त्यांनी काही संस्कृत-मराठी कविता केल्या. ते रविकिरण मंडळाचे सदस्य होते आणि मंडळाच्या १९२४ मधील 'उषा' काव्यसंग्रहात त्यांच्या कविता आहेत. १९४६ मध्ये बेळगाव येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. याच संमेलनात संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीचा ठराव पहिल्यांदा मंजूर झाला.
समुदायाने जोडले
बंद