चरित्र
चरित्र
रामचंद्र दत्तात्रेय रानडे ऊर्फ गुरुदेव रानडे (३ जुलै १८८६, जमखंडी – ६ जून १९५७) हे भारतीय तत्त्वज्ञ आणि अलाहाबाद विद्यापीठाचे माजी कुलगुरू होते. पुण्यातील डेक्कन कॉलेजमध्ये शिक्षण घेऊन १९१४ मध्ये त्यांनी एम.ए. पदवी मिळवली. सुरुवातीला ते सांगलीच्या विलिंग्डन महाविद्यालयात प्राध्यापक होते; त्यानंतर १९२७ ते १९४५ या काळात त्यांनी अलाहाबाद विद्यापीठात तत्त्वज्ञान विभागाचे प्रमुख म्हणून अध्यापन केले. १९४५ ते १९४७ या काळात ते त्या विद्यापीठाचे कुलगुरू होते. इंचगिरी (निंबर्गी) संप्रदायाचे प्रमुख अनुयायी म्हणून त्यांनी अनेक पुस्तके, व्याख्याने आणि अनुग्रहाद्वारे परमार्थाचा प्रसार केला.
समुदायाने जोडले
बंद