गुरुनाथ नाईक

चरित्र

चरित्र

गुरुनाथ विष्णू नाईक (जन्म : १९३८) हे मराठी रहस्यकथालेखक आणि पत्रकार आहेत. सर्वाधिक १२०८ कादंबऱ्या लिहिल्याबद्दल २०१३ मध्ये त्यांचे नाव 'लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स'मध्ये नोंदवले गेले. १९७० ते १९९० च्या दशकात महाराष्ट्रातील ग्रामीण आणि शहरी भागांत वाचनसंस्कृती रुजवण्यात त्यांच्या 'पॉकेट बुक' आकारातील रहस्यकथांचा मोठा वाटा होता. 'कॅप्टन दीप', 'गरुड' आणि 'उदयसिंह चौहान' हे त्यांनी निर्माण केलेले नायक वाचकांच्या स्मरणात आहेत.

समुदायाने जोडले
बंद