चरित्र
चरित्र
हमीद उमर दलवाई (२९ सप्टेंबर १९३२ – ३ मे १९७७) हे भारतीय समाजसुधारक, विचारवंत आणि मराठी साहित्यिक होते. त्यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील मिरजोळी येथे झाला; मुंबईतील रुपारेल आणि इस्माईल युसुफ महाविद्यालयांत त्यांनी शिक्षण घेतले. महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राममनोहर लोहिया यांच्या विचारांचा त्यांच्यावर खोल प्रभाव होता. मुस्लिम समाजसुधारणा आणि धर्मनिरपेक्षतेसाठी त्यांनी २२ मार्च १९७० रोजी पुणे येथे मुस्लिम सत्यशोधक मंडळाची स्थापना केली. १८ एप्रिल १९६६ रोजी त्यांनी सात मुस्लिम महिलांना एकत्र आणून मुंबईतील विधानभवनावर (कौन्सिल हॉल) जाऊन तोंडी तलाक, बहुपत्नीत्व यांमुळे होणारी मुस्लिम स्त्रियांची घुसमट सरकारसमोर मांडली.
समुदायाने जोडले
बंद