इरावती कर्वे

चरित्र

चरित्र

इरावती कर्वे (१५ डिसेंबर १९०५ – ११ ऑगस्ट १९७०) या मानववंशशास्त्र, समाजशास्त्र आणि मानसशास्त्राच्या अभ्यासक आणि मराठी लेखिका होत्या. त्यांचा जन्म म्यानमारमधील मिंज्यान येथे झाला; पूर्वाश्रमीचे नाव इरावती करमरकर. त्यांचे शिक्षण पुणे येथे झाले आणि बर्लिन विद्यापीठातून त्यांनी पीएच.डी. मिळवली. १९३९ मध्ये पुण्याच्या डेक्कन कॉलेजात मानववंशशास्त्राच्या प्रपाठक म्हणून त्यांची नेमणूक झाली. त्यांनी मराठी आणि इंग्रजीत लेखन केले. महाभारतावरील 'युगान्त' या समीक्षाग्रंथाला १९७२ चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. 'परिपूर्ती', 'भोवरा', 'गंगाजल' हे ललित लेखसंग्रह आणि 'मराठी लोकांची संस्कृती', 'हिंदूंची समाजरचना' हे ग्रंथ त्यांनी लिहिले. लेखिका गौरी देशपांडे या त्यांच्या कन्या होत.

समुदायाने जोडले
बंद