चरित्र
चरित्र
जगदीश खेबूडकर (१० मे १९३२ – ३ मे २०११) हे मराठी कवी आणि गीतकार होते. त्यांचा जन्म कोल्हापूर-राधानगरी रस्त्यावरील खेबवडे (हळदी) येथे झाला; पेशाने ते शिक्षक होते. वयाच्या सोळाव्या वर्षी लिहिलेले 'मानवते तू विधवा झालीस' हे त्यांचे पहिले दीर्घकाव्य मानले जाते. लोकसंगीत, पोवाडा, अभंग, ओवी अशा विविध प्रकारांत त्यांनी रचना केल्या. आपल्या कारकिर्दीत त्यांनी सुमारे तीन हजार पाचशे कविता आणि अडीच हजारांहून अधिक गीते लिहिली.
समुदायाने जोडले
बंद