जी. शंकर कुरुप

चरित्र

चरित्र

गोविंद शंकर कुरुप तथा जी. शंकर कुरुप (३ जून १९०१ – २ फेब्रुवारी १९७८) हे मल्याळम भाषेतील प्रसिद्ध कवी होते. त्यांचा जन्म केरळमधील एर्नाकुलम जिल्ह्यातील नायतोट येथे झाला. वडिलांच्या अकाली निधनानंतर ज्योतिषी आणि व्यासंगी पंडित असलेल्या मामांच्या देखरेखीखाली त्यांचे शिक्षण झाले आणि त्यांना संस्कृतची गोडी लागली. आठव्या वर्षापर्यंत त्यांनी 'अमरकोश', 'सिद्धरूपम्' इत्यादी ग्रंथ मुखोद्गत केले होते आणि नवव्या वर्षी त्यांनी कविता लिहायला सुरुवात केली. १९१८ मध्ये त्यांनी मल्याळम साहित्यातील 'पंडित' ही परीक्षा उत्तीर्ण केली.

समुदायाने जोडले
बंद