चरित्र
चरित्र
जॉन रे ग्रिशम ज्युनियर (जन्म : ८ फेब्रुवारी १९५५, जोन्सबोरो, आर्कान्सा, अमेरिका) हे अमेरिकन लेखक, वकील आणि कार्यकर्ते आहेत. कायदेविषयक रहस्यकथा आणि गुन्हेगारीविषयक कादंबऱ्यांसाठी ते प्रामुख्याने ओळखले जातात. त्यांची पुस्तके जगभरातील अनेक देशांत आणि ४२ भाषांत अनुवादित झाली आहेत. १९८१ मध्ये मिसिसिपी विद्यापीठातून त्यांनी कायद्याची पदवी मिळवली. १९८४ ते १९९० या काळात ते मिसिसिपीच्या विधिमंडळात कार्यरत होते.