जयंत पवार

चरित्र

चरित्र

जयंत पवार (२२ फेब्रुवारी १९६० – २९ ऑगस्ट २०२१) हे मराठी साहित्यिक होते. नाट्यसमीक्षा, एकांकिका, नाटक, कथा, वैचारिक आणि ललित लेख अशा अनेक प्रकारांत त्यांनी लेखन केले; चित्रपटांच्या पटकथा आणि संवादही लिहिले. 'महानगर', 'चंदेरी' आणि 'लोकसत्ता'मध्ये काम केल्यानंतर अनेक वर्षे त्यांनी 'महाराष्ट्र टाइम्स'मध्ये पत्रकारिता केली. 'अधांतर' हे त्यांचे पहिले प्रसिद्ध नाटक; त्याचा पहिला प्रयोग ८ ऑगस्ट १९९७ रोजी झाला आणि त्याला अनेक मानाचे पुरस्कार मिळाले. 'काय डेंजर वारा सुटलाय' हेही त्यांचे नाटक आहे. 'नाद', 'निनाद' आणि 'पडसाद' हे त्यांचे एकांकिकासंग्रह आहेत. २०१० मध्ये प्रकाशित झालेल्या 'फिनिक्सच्या राखेतून उठला मोर' या पहिल्याच कथासंग्रहाला २०१२ मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. मुंबई येथे त्यांचे निधन झाले.

समुदायाने जोडले
बंद