जयंत साळगांवकर

चरित्र

चरित्र

जयंत शिवराम साळगांवकर (१ फेब्रुवारी १९२९, मालवण – २० ऑगस्ट २०१३) हे मराठी ज्योतिषतज्ज्ञ, लेखक, पत्रकार आणि उद्योजक होते. १९७३ पासून प्रकाशित होणाऱ्या 'कालनिर्णय' या दिनदर्शिकेचे ते संस्थापक-संपादक होते; ही दिनदर्शिका सुमारे नऊ भाषांतून प्रसिद्ध होते. मॅट्रिकपर्यंत त्यांनी संस्कृतचे पारंपरिक शिक्षण घेतले होते. ते मुंबईतील श्री सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे विश्वस्त आणि आयुर्विद्यावर्धिनी या आयुर्वेदिक संशोधन संस्थेचे अध्यक्ष होते. त्यांच्या पत्नी जयश्री साळगांवकर यांचे 'लाडूच लाडू' हे पाककलेवरील पुस्तक प्रसिद्ध आहे.

समुदायाने जोडले
बंद