चरित्र
डॉ. कैलास रायभान दौंड
जन्मदिनांक: १ जून १९७३
पेशा: भाषा शिक्षक, प्रथितयश कवी, कादंबरीकार व बालसाहित्यिक
पत्ता: मु. सोनोशी, पो. कोरडगाव, ता. पाथर्डी, जि. अहिल्यानगर ४१४१०२ | 'शब्दब्रह्म', बाबुजी आव्हाड महाविद्यालयाच्या ग्राऊंडमागे, आनंदनगर, पाथर्डी, जि. अहिल्यानगर ४१४१०२
संपर्क: ९८५०६०८६११
🎓 शिक्षण
एम.ए. (मराठी), बी.एड., डी.एड., नेट (मराठी)
पीएच.डी. (विद्या वाचस्पती) - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, संभाजीनगर (जुलै २०१५). संशोधनाचा विषय: 'मराठी ग्रामीण कादंबरीचा चिकित्सक अभ्यास (इ. स. २००० ते २०१०)'.
✍️ साहित्य संपदा (१६ प्रकाशित पुस्तके)
कवितासंग्रह: उसाच्या कविता (२००१, दुसरी आवृत्ती २०१८), बसाण (२००२), दयानिधी संत ते (२००५), भोग सरु दे उन्हाचा (२००७), अंधाराचा गाव माझा (२०१२), आगंतुकाची स्वगते (२०२१).
कादंबरी: पाणधुई (२००५), कापूसकाळ (२००९, २०१५, २०१८), तुडवण (२०१९).
कथा व ललित लेखन: एका सुगीची अखेर (कथासंग्रह - २००९), तहोळीचं पाणी (ललितलेख संग्रह - २०१२).
बालकुमार साहित्य: आई जाणिवांची फुले (२०२०), माझे गाणे आनंदाचे (२०२३), मी पुस्तक होईन (बालकथासंग्रह - २०२१), खारूताईचे जंगल आणि इतर गोष्टी (२०२५).
समीक्षा: बालसाहित्याचे वर्तमान (२०२३).
📰 स्तंभलेखन आणि लेखमाला
'गाव: उब आणि धग' (१७ लेखांची मालिका - साहित्य चपराक मासिक).
'जाणिवा लोकसंचिताच्या' (२०२३ - दैनिक अॅग्रोवन).
'कथान्वय' (लोककथा विषयक लेखमाला, २०२४ - दैनिक अॅग्रोवन).
'शिक्षणयात्री' (उपक्रमशील शिक्षकांचा परिचय, २०२५ - दैनिक अॅग्रोवन).
📚 अभ्यासक्रमात साहित्याचा समावेश
कापूसकाळ (कादंबरी): मुंबई विद्यापीठ आणि एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ, मुंबई यांच्या बी.ए. अभ्यासक्रमात समाविष्ट.
उसाच्या कविता (कवितासंग्रह): कर्नाटक विद्यापीठ, धारवाडच्या एम.ए. अभ्यासक्रमात (२०१७ पासून).
तुडवण (कादंबरी): डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या एम.ए. (प्रथम वर्ष) अभ्यासक्रमात.
गोधडी (कविता): महाराष्ट्र राज्याच्या इयत्ता आठवीच्या 'बालभारती' पाठ्यपुस्तकात समाविष्ट (जून २०१८ पासून).
🏆 प्रमुख पुरस्कार आणि सन्मान
पुरस्कार: बंधुता प्रतिष्ठानचा 'महात्मा फुले साहित्य पुरस्कार', 'निरंजन उजगरे काव्य पुरस्कार', 'अभिरुची गौरव साहित्य पुरस्कार', 'पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील साहित्य पुरस्कार', 'भी. ग. रोहमारे उत्कृष्ट साहित्य पुरस्कार', म.सा.प. पुणेचा 'ग. ल. ठोकळ पारितोषिक' यांसह ३० हून अधिक पुरस्कार प्राप्त.
साहित्यावरील संशोधन: विविध विद्यापीठांतील (पुणे, अमरावती, नाशिक, संभाजीनगर) अभ्यासकांकडून साहित्यावर एम.फिल. व इतर संशोधन. दोन संशोधकांकडून समग्र साहित्यावर पीएच.डी. सुरू.
विशेषांक: 'तिफण' त्रैमासिकातर्फे 'डॉ. कैलास दौंड साहित्य विशेषांक' प्रकाशित.
🎤 संमेलनाध्यक्ष पदे व विशेष सहभाग
अध्यक्ष: १७ वे पाथर्डी साहित्य संमेलन (२०१७).
अध्यक्ष: ३ रे राज्यस्तरीय साहित्य संमेलन, कोकमठाण (२०१९).
कविसंमेलनाध्यक्ष: १४ वे शब्दगंध साहित्य संमेलन (२०१९), सेनापती बापट साहित्य संमेलन, अहिल्यानगर (२०२५) आणि कुद्रेमानी साहित्य संमेलन, कर्नाटक (२०१२).
सहभाग: ८७ व्या (चिपळूण), १९ व्या (सातारा) आणि ९३ व्या (धाराशिव) अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांत निमंत्रित कवी व परिचर्चक म्हणून सहभाग.
राष्ट्रीय सहभाग: साहित्य अकादमी, नवी दिल्ली आयोजित 'साहित्योत्सव २०२४' मध्ये राष्ट्रीय परिसंवादात सहभाग.