चरित्र
चरित्र
नरहर विष्णू ऊर्फ काकासाहेब गाडगीळ (१० जानेवारी १८९६ – १२ जानेवारी १९६६) हे मराठी राजकारणी, अर्थशास्त्रज्ञ, लेखक आणि स्वातंत्र्यसैनिक होते. स्वातंत्र्यलढ्यात त्यांना आठ वेळा कारावास झाला आणि एकूण साडेपाच वर्षे ते तुरुंगात होते. ते केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्री (१९४७–१९५२), पंजाबचे राज्यपाल (१९५८–१९६२) आणि १९६४ पासून पुणे विद्यापीठाचे कुलगुरू होते. राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, विधी, इतिहास आणि ललित विषयांवर त्यांनी पंचवीसहून अधिक ग्रंथ लिहिले; १९४३ मधील 'ग्यानबाचे अर्थशास्त्र' हा सुबोध मराठीत अर्थशास्त्राची चर्चा करणारा उल्लेखनीय ग्रंथ मानला जातो. १९६२ मध्ये सातारा येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
समुदायाने जोडले
बंद